गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्र्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
वडसा देसाईगंज जवळील फरी गावातील एका कुटुंबाचे नामक मनीषा शेंडे ह्यांचे घर मागील आठवड्यात शॉर्ट सर्किटने जळाले होते, अशी माहिती तहसिलदार प्रीती दुधलकर मॅडम ह्यांच्या कडून प्राप्त होताच लायन्स क्लब ने वेळ न घालवता पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूची आणि आर्थिक मदत केली..ह्यात पतंजली च्या संचालिका ज्योती देवकुले, सपना बोरेवार, शेमदेव चापले ,प्रा. देवानंद कामडी, इंजि पुरुषोत्तम वंजारी,नितीन बट्टुवार,नितीन चंबुलवार ह्यांच्या कडून मदत प्राप्त झाली.
सदर भेटीच्या वेळेस लायन्स क्लबचे सचिव नितीन चंबुलवार, झोनचेअरपर्सन दीपक मोरे, शेमदेव चापले,प्रवीण मिरगे,नितीन बट्टुवार तसेच वडसा देसाईगंज च्या तहसिलदार प्रीती दुधलकर,नायब तहीलदार मने मॅडम,
तलाठी उमेश मगरे आणि समस्त गावकरी मोठ्या उपस्थित होते.
Post a Comment