गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
वैरागड
वैरागड : गावात संक्रात सणानिमित्त तिळगुळ वाटून गोड-गोड बोलण्याचे सण साजरा करीत असताना आज दि. १५ जानेवारी रोजी माळी मोहल्ल्यातील अवैध व्यावसायिक संजय पात्रीकर किरकोळ वादातून भाजीपाला विक्रेता अमोल पात्रीकर याला तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आणि अडवणूक करणारे दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.
येथील माळी मोहल्ल्यात राहणारा अमोल केशव
पात्रीकर (वय ३६ वर्षे) हा सकाळी माळी मोहल्ल्यातील उपरे किराणा दुकानासमोर डग्गातून भाजीपाला विक्री करीत असताना अवैध्य दारू विक्रेता संजय श्रीरंग पात्रीकर (वय 37 वर्ष) यांचे दोघात पैशाच्या वादातून बाचाबाची झाली. दोघात वाद वाढल्याने गुन्हेगार संजय पात्रीकर यांने घरून तलवार आणून अमोल पात्रीकर यांच्यावर वार केला यात
अमोल पात्रीकर याच्या डाव्या डोक्या जवळील कानाजवळ जबर जखम झाली तर उजव्या हाताच्या बोटाला जखमा झाल्या. हल्ला होताच अमोल पात्रीकर यांचे वडील केशव पात्रीकर आणि प्रकाश बनकर अडवणूक करण्यास गेले असता तलवारीने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला जबर मार लागले. जखमी अवस्थेत अमोल पात्रीकर याला वैरागड येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी विजय धुमाळे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता आरमोरी उप जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
घटनेची माहिती मिळतात आरमोरी ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलीस विभागाचे कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक चलाख, हवालदार किशोर मेश्राम, बीट जमादार राकेश टेकाम आणि पोलीस शिपाई लकी मामुलकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून नालीत असलेली तलवार जप्त केली आणि गुन्हेगार संजय पात्रीकर याला जेरबंद करून आरमोरी पोलीस स्टेशन येथे नेऊन पुढील तपास करीत आहेत. गुन्हेगार हा अवैद्य व्यवसाय करीत असून त्याची गावात दहशत निर्माण झाली आहे. खुले आम तलवार घेऊन नागरिकांवर वार करीत असल्याने पोलीस विभागाने त्याला हद्दपार करून त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
Post a Comment