गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली
सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कॉलनी गोकुळनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव इचोडकर माजी सभापती पं स . गडचिरोली हे होते . प्रमुख अतिथी मुनेश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष आरपिआय , भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , निशा बोदेले अध्यक्षा सम्राट अशोक बुद्ध विहार , तुळशराम सहारे माजी सभापती न.प गडाचरोली , प्रमोद राऊत एम एन टिव्ही चॅनल , अनमोल डोंगरे , लवकुश भैसारे हे होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव इचोडकर माजी
सभापती पं. स गडचिरोली म्हणाले की , रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊने छ.शिवाजी महाराज घडविला . जर आजच्या प्रत्येक महिलांनी असा एखादा शुरविर मुलगा घडविला तर भारतात लवकरच सुवर्ण युग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .
यावेळी मुनेश्वर बोरकर आरपिआय जिल्हाध्यक्ष , भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , निशा बोदेल अध्यक्षा सम्राट अशोक बुद्धविहार , प्रमोद राऊत एम एन टिव्ही चॅनल , तुळशिराम सहारे माजी सभापती न .प . गडचिरोली , अनमोल डोंगरे , लवकुशा भैसारे, यांनी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे संचालन प्रेमलता कान्हेकर यांनी केले तर आभार अरुणा उंदिरवाडे यांनी मानले .
या कार्यक्रमाला इंदिरा वानखेडे , कांता देवगडे, संगिता मेश्राम, धर्मानंद मेश्राम , मंगला बाबनवाडे , माया मेश्राम , अनन्या उंदिरवाडे , दामोधर शेंडे , भिमराव गोंडाणे, ठाकूर , लाटीलवार उपस्थित होते .
Post a Comment