गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्र्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत श्री संत गाडगे महाराज विद्यालय गडचिरोली येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय च्या वतीने रस्ता सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आली . यावेळी योगेंद्र मोडक आरटीओ मोटर वाहन निरिक्षक यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की , जीवन हे अमुल्य आहे . अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा . कोणतीही नशापाणी करून वाहन चालवू नये . वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा .
पुढे म्हणाले की मी सुद्धा याच शाळेचा विद्यार्थी आहे आणि मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो . गरीबीची मुलेसुद्धा चांगले घडतात . याचा उदाहरण मीच आपल्यासमोर उभा आहे . मार्गदर्शनानंतर सर्व विद्यार्थ्यांना पेन व नोटबुक दिले तसेच सर्वांना फराळ दिले .
या कार्यक्रमाचे संचालन भोजराज कान्हेकर यांनी केले तर आभार रतन कराडे यांनी माणले . या कार्यक्रमाल एम.के. हजारे , डब्लू . बी कृष्णाके, मिना मुरमुरवार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment