वनिता रतन बांबोळे यांनी शिवनी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्ध मूर्तीचे प्रतिष्ठापना होणार...

 गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

मुनिश्वर बोरकर 
संपादक 




गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील बुद्ध विहारात बुद्ध मुर्ती असावी अशा संकल्प सामाजीक कार्यकर्ता वनिता बांबोळे गडचिरोली यांनी करून कन्हान नागपूर येथील कार्यक्रमात थॉयलड च्या पुज्य भन्ते विनाचार्य , नितीन गजभिये , स्मिता वाकडे नागपूर , गोपाल रायपुरे , प्रा. मुनिश्वर बोरकर , यांच्या उपस्थितीत तथागत बुद्धाची मुर्ती शिवणी येथील बुद्ध




 विहारात आणण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा स्टेज सजावटचे कामकाज पुर्ण झाल्यानंतर बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापणेचा भव्य कार्यक्रम घेण्याचा सुतोवाच दान कर्त्या वनिता रतन बांबोळे यांनी केले .बुद्ध विहारात शिवणी येथे बुद्ध मुर्ती आणण्यात आल्यानंतर रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर ' बुद्ध मुर्तीचे दान कर्त्या वनिता बांबोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध विहारात बुद्ध वंदना



 घेण्यात आली. शिवणी येथील बौद्ध समाजाच्या सचिव आशा दुर्गे , अध्यक्ष दुधे , जगदिश खोब्रागडे , कौश्यला लाटेलवार , शालु कन्नाके . पुरुषोत्तम बांबोळे , सचिन बांबोळे , कल्पना उंदिरवाडे , नरेंद्र बांबोळे , सचिन उंदिरवाडे , खोब्रागडे मॅडम ' प्रतिक बांबोळे , संतोष गोवर्धन , दिलीप शेंडे आदि सहीत बहुसंख्य उपाषक - उपाषिका उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments