परभणी प्रकर्णी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, शिंदेवाही बौद्ध बांधवांची मागणी...

. गडचिरोली सुपर
फास्ट न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
शिंदेवाही



परभणी येथील संविधान विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सिंदेवाही तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी व संविधान प्रेमी जनतेनी मा. तहसीलदार साहेब व मा. पोलिस निरीक्षक साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला व प्रशासनाला शिष्टमंडळाव्दारे निवेदन सादर करुन गुन्हेगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोबतचं या कृत्याचा निषेध करण्या करिता परभणी येथील आंबेडकरी अनुयायांनी परभणी बंदचे आव्हान करून परभणी बंद ठेवण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनामध्ये सहभागी आंबेडकर अनुयायांवर व तरुणांवर गुन्ह्याची नोंद करून पोलिस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन द्वारे युवकांना तथा महिलांना पकडून त्यांना मारहाण करण्याच्या जो प्रकार चालविलेला आहे तो त्वरित थांबवावा व आंबेडकरी अनुयायांवर लागलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. या शिष्टमंडळात सिंदेवाही




तालुक्यातील सूर्यजित खोब्रागडे, नंदू खोब्रागडे, तेजस डोंगरे, सचिन शेंडे, अनिल बारसागडे, युवराज जीवतोडे, शुभांगी खोब्रागडे, नलिनी रामटेके, ज्योती खोब्रागडे,




मीनाक्षी बारसागडे, विकास गेडाम, भोजराज सोरदे, नंदू खोब्रागडे, शांताबाई पाझारे, निलेश मेश्राम, प्रज्ञा मेश्राम, दर्शना खोब्रागडे, रिता पोपटे, प्रगती वंजारी, सुप्रिया धनविजय, डॉ. रेवानंद बांबोडे, धनंजय साखरे, शितल शेंडे, लता शेंडे, ट्विंकल सूर्यवंशी, रंजना चूनारकर, पुष्पा साखरे व ममता रामटेके हे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments