गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनीश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली -
पोटेगाव येथे भिमज्योती नवयुवक बहुउद्देशिय संस्था पोटेगाव च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला . सुरुवातील ध्वजारोहण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य रंगारी होते .प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर मुंजमकार , सिद्धार्थ गोवर्धन , डॉ. विलास गोवर्धन होते . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य रंगारी म्हणाले की डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला . प्रमुख मार्गदर्शन ज्ञानेश्वर मुंजमकार म्हणाले की, डॉ
बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करायचे असले तर समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणे गरजेचे आहे . समाजात स्वार्थी व दलबदलू लोक असल्याने समाजाची अधोगती होत आहे . यावेळी डॉ विलास गोवर्धन , सिद्धार्थ गोवर्धन , विनोद मडावी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले .
त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता देवाजी बांबोळे पोटेगाव यांचे घरी बुद्धामुर्तीची स्थापना करण्यात आली . यावेळी त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली . यावेळी पंकज रामटेके , छन्नालाल फुलझेले , धनराज
दामले , प्रदिप बांबोळे , महेश वाडगुरे , दिवाकर हलामी, कल्पना फुलझेले, संगिता मुंजमकार , रुशाली गोवर्धन , नेहा मेश्राम , निकीता बांबोळे , मिना रंगारी, निर्मल गोवर्धन , नेहा बांबोळे , प्रिया मुंजमकार , मिना रामटेके , सुमित्रा बांबोळे , अमक्षा गोवर्धन , प्रणय रंगारी , विनय गोवर्धन व समाजबांधव उपस्थित होते .
Post a Comment