न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
वडसा - वडसा तालुक्यांतील कसारी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुरेश संग्रामे हा दुचाकी चालवित असतांना त्यांच्या खिशातील मोबाईल च्या स्फोटमुळे अपघात होवून निधन झाले . खिशातील मोबाईल चे Internet network सुरुच होते तर तो आपल्या राहते गावी दुचाकीने शाळा करून जात असतांना मोबाईल चा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. सुरेश संग्रामे ५५ हा गोंदिया जिल्ह्यातील सिरेगांव टोला येथील मुळ रहिवासी असुन तो प्राथमिक शाळा कसारी तालुका वडसा जिल्हा गडचिरोली येथील शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होता . संग्रामे शिक्षक हे सिरेंगाव ते कसारी
शाळेत दररोज येणे - जाणे करीत होता . आज दि. ६ डिसेंबर २०२४ ला सकाळची शाळा करून आपल्या राहते गावी सिरेगांव ला दुचाकीने जात असतांना व दुचाकी सुरूच असतांना एका ईसमाचा त्याला फोन आल्यामुळे त्यांनी तो रिसिव्ह केला व घाईघाईत मोबाईल बंद न करता दुचाकीने जात होता परंतु मोबाईलचे Internet network सुरुच होते अश्यातच गाडी वेगाने जात असतांना रस्त्यावरील खंड्यात गाडी जाताच मोबाईचा स्फोट झाला. मोबाईल वरच्या
शिखातच होता त्यामुळे मोबाईल चा स्फोट होवून त्याचे कपडे फाटले व मोबाईचा स्फोट छातीला लागला तश्यातही दुचाकी खंड्यात गेली व त्याला काही सुचेनासे झाले त्यामुळे मोबाईलच्या स्फोट होवून त्याचे निधन झाले .वडसा - देसाईगंज पोलीस त्याला ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले असतांना डॉक्टरांनी त्याला मृत्यु घोषीत केले . देसाईगंज पोलीसअधिक तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असुन त्यांच्या अकस्मित निधनामुळे कसारी व सिरेगांव येथे शोककळा पसरली होती.
Post a Comment