सीरोंचा येथे फुले, शाहू ,आंबेडकर महोत्सव...

गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
प्रा. मुनिश्र्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 




सिरोंचा.
अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच तारणारे असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते बुधवार 25 डिसेंबर रोजी स्थानिक परीवर्तन भवन परीसर शाहूनगर येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित फुले शाहू, आंबेडकर महोत्सवात परीसंवाद कार्यक्रमाच्या उदघाटनीय स्थानावरून बोलत होते. तत्पूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन केले.
परिसंवादाचे विषय 'दक्षिण मध्य भारतात परिवर्तन भवन ची भूमिका व कार्य' आणि 'भारतीय संविधान व समाज चेतना' हे होते.परिसंवाद उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पेंटा रामा तलांडी तर विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जगदीश रालबंडीवार, सत्यनारायण परपटलावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे उदघाटनीय स्थानावरून बोलतांना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नष्ट करून देशात समानता प्रस्थापित केले असून या देशात शिव, फुले, बिरसा मुंडा, आंबेडकरांचे विचारच तारणार असल्याचे मत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त करून फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे महोत्सव होणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कार्सपल्ली यांनी तर उपस्थितांचे आभार शंकर कावरे यांनी मानले समता सैनिक दल यांनी पथसंचलन करून मान्यवरांचे स्वागत केलेआमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, हर्षवर्धन राव बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, निता तलांडी, सतीश भोगे, जगदीश रालबंडीवार आदी व अन्य मान्यवरांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच समता सैनिक दल व मरपल्ली येथील भीमसैनिक, युवकांनी मान्यवरांच्या गळ्यात निळा गमचा घालून व पथसंचलन करून जंगी स्वागत केले. परीसर निळामय झाले होते. त्यामुळे एक वेगळा आनंद व उत्साह दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे दुपारी सिरोंचा शहरातून भव्य रॅलीही काढण्यात आले.

0/Post a Comment/Comments