गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच अवीशांत पांडा सर यांचे नव्याने नियुक्ती झाली आहे. अवीशांत पांडा सर यांचे नव्याने नियुक्ती झाल्याने त्यांचे स्वागत करणे आद्य कर्तव्य समजून प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ जिल्हा श्याखा गडचिरोलीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला .आणि जिल्ह्यामध्ये काही चालत असलेल्या अवैध धंद्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये कोंढाळा मेंढा येथील वाळू घाटातून हजारो ब्रास वाळूचा उपसा झाल्याने शासनाचा लाखो करोडो रुपयाचा महसूल बुडालेला असल्याने त्या वाळू घाटाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत आणि जिल्ह्यांमध्ये चालत असलेल्या अवैध्य धंदे
कोंबडा बाजार ,दारू चक्री (फिरकि ) आदीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करणे बाबत पत्रकार संरक्षण कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बाबत,पत्रकारांना संरक्षण देणे बाबत जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये स्वतंत्र पत्रकार भवन निर्माण करणे बाबत . पत्रकारांना स्वतंत्र गृहनिर्माण योजना चालू करणे बाबत पत्रकारांना एसटी बस मध्ये सवलत डिजिटल मीडिया प्रिंटेड इलेक्ट्रॉनिक मीडिया या मधील सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने
अधिस्वीकृती देणे बाबत डिजिटल मीडियातील पत्रकारांना शासकीय जाहिराती मिळणे बाबत माननीय जिल्हाधिकारी अवीशांत पांडा सर यांना निवेदनातून देण्यात आल्या .माननीय जिल्हाधिकारी अवीशांत पांडा सर यांचे स्वागत करताना व निवेदन देताना प्रेस
संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाप्रमुख दिनेश बनकर जिल्हा सचिव विजय शेडमा के जिल्हा संघटक सोमनाथ उईके जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान रामटेके समीर मोहिते जिल्हा सहसचिव वाघाडे आधी संघातील पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
Post a Comment