गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
देसाईगंज - म. गांधी विघ्यालय वडसा देसाईगंज परिसरातील पाळीव कुत्र्यांनी रुहानिका गेडाम वडसा हिच्या पायाच्या चावा घेऊन तिला जखमी केले त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी त्या पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अश्या कुत्र्यांना पाळणाऱ्या मालकावर कारवाई करावी अशी मागणी व तक्रार पोलीस स्टेशन देसाईगंज येथे करण्यात आलेली आहे. देसाईगंज येथील म. गांधी विद्यालय व युनिव्हरसिटी कॉन्व्हेन्ट परिसरातील पाळीव कुत्र्यांने रुहानिका गेडाम या
शाळेकरी मुलीच्या पायाचा चावा घेऊन तिच्या पायाला जखम झाली आहे. सदर पाळीव कुत्र्ये असुन सुध्दा ते लावारिस कुत्र्यां सारखे वागुन सदर परिसरात वावर करणाऱ्या लोकांवर धावतात त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . सदर कुत्र्यें हे रजनी आत्राम हिच्या मालकीचे असुन सुद्धा त्या
कुत्र्यांना घरी बांधुन न ठेवता मोकाट सोडत असल्यामुळे त्या कुत्र्यापासुन सदर परिसरात दहशत निर्माण झाली आहे. अश्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व कुत्र्यांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी व तक्रार पोलीस स्टेशन देसाईगंज येथे सदर परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.
Post a Comment