गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पांडा यांची वर्णी...

 गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर
संपादक 




 गडचिरोली - गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदी झाल्यामुळे आता त्यांच्या जागेवर नागपूर टेक्सटाईल चे आयुक्त अविशांत पांडा हे गडचिरोली जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी म्हणुन रुजु होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे नविन सरकार आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु केले असुन अश्यातच अविशांत पांडा हे गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून रुजु होणार तर चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जोन्सन हे येणार आहेत. गडचिरोली जिल्हयाचे नविन जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या कडून गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या फार अपेक्षा आहेत.

0/Post a Comment/Comments