सुपर फास्ट न्युज
वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील मौजा येरडी येथील डॉ. आंबेडकर चौकात समता सैनिक दलाची स्थापना व शाखा उदघाटन समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष अभिमन्यु बसोंड यांचे हस्ते पार पडले . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी अधिकारी संजय रामटेके कुरखेडा हे होत तर प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते किशोर सरदारे .,प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली विट्ठल वासनिक पुरुषोत्तम भैसारे , प्रल्हाद लाळे , गिरिधर सिद्धाम , देवानंद जनबंधू ' जयश्री लाळे ,इत्यादी
लाभणे होते . याप्रसंगी संजयजी रामटेके यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे उर्वरीत कार्य समता सैनिक दलच करु शकते . त्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याची एकजुट दाखवणे महत्वाचे आहे. जिथे आपल्यावर अन्याय होत असेल त्या वेळेस समता सैनिकांनी पुढाकार घेऊन गावा गावात शाखा निर्माण झाली पाहिजे. याप्रसंगी किशोर सरदारे , प्रा.मुनिश्वर बोरकर , मनोज अंबादे, ललिता चौधरी ,यांनी सुद्धा मार्गदर्शन केले , तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम भैसारे
संचलन जनबंधु तर आभार साखरे मॅडम हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिमन्यु बन्सोड , मुक्ताजी दुर्गे , शालीक साखरे' कैलास नंदेश्वर पुरुषोत्तम जनबंधु , तसेच येरंडी परिसरातील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आदिनी सहकार्य केले तर परिसरातील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .
Post a Comment