सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
सावली - अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूर तालुका सावली तहसिल कार्यालय समोर बेदुमत सामुहिक आमरण उपोषण सुरु असुन आमच्या मागण्या जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी येऊन सोडविल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही अशा निर्धार उपोषण कर्त्यांनी घेतला. सावली येथील स .क्र . ७९७ व ७९८ हि जागा आदिवासी वस्तीगृहासाठी आरक्षीत करावी . कंपन्यामधे १०० आदिवासींना नोकऱ्या घ्यावात . आदिवासीसाठी १० ते १५ लाख रुपये उद्योगाकरीता देण्यात यावेत आदि ३१ मागण्याचे निवेदन तहसिलदार सावली व
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. आमरण उपोषण मंडपात अतुल दिवाकर कोडापे , अशोक कन्नाके , पुरण बाबु मडावी , रमेश कन्नाके , उत्तम गेडाम , युवराज उईके , शारदाताई उईके , यात्रिका कुमरे , कृष्णा कन्नाके , भास्कर गेडाम , संतदास सुरपाम, रमेश कन्नाके आदि आमरण उपोषणाला बसले आहेत . सदर उपोषण मंडपाला प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार , वनपरिक्षेत्र अधिकारी धुर्वे , नायब तहसिलदार चांदेकर विस्तार अधिकारी एस. एम. चौधरी , अमोल नवलकर प्रकल्प विभाग चंदपुर , रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे चंद्रपूर आदिनी उपोषण कर्त्यार्सोबत चर्चा केली. परंतु उपोषण कर्ते जिल्हाधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आमच्या समस्या सोडवाव्यात अश्या त्यांच्या मागण्या आहेत.
Post a Comment