मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा गडचिरोली दौरा कोणसरी येथील विविध विकास प्रकल्पाचे होणार एक जानेवारी रोजी उद्घाटन आणि भूमिपूजन, माजी खासदार अशोक जी नेते यांनी आज कोनसरी येथे भेट देऊन तयारीची केली पाहनी....

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 




दि. ३१ डिसेंबर २०२४
गडचिरोली 
गडचिरोली: राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस नववर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्रीपदी नव्याने विराजमान झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा असून जिल्ह्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भाजपचे अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी खासदार मा.खा. अशोकजी नेते यांनी आज कोनसरी येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली.


यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये आ. डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्र.का. सदस्य रविंद्र ओल्लालवार, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, कि.मो.आ. जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मो.जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, प्रकाश दत्ता,भाष्कर बुरे, तसेच लॉयड्स मेटल्सचे एमडी बी. प्रभाकरन आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*_मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प:_*

लॉयड्स डीआरआय प्लांट

लॉयड्स राज विद्या निकेतन (सीबीएसई शाळा)

लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल

लॉयड्स वन्या क्लोदिंग कंपनी

फॅमिली क्वार्टर्स आणि पोलीस ऑफिसर्स फॅमिली क्वार्टर्स

जिमखाना आणि बालोद्यान

तसेच यावेळी स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.

गडचिरोलीतील हा दौरा जिल्ह्याच्या विकासामध्ये एक नवा अध्याय लिहील, अशी अपेक्षा जिल्हयातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments