सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
आरमोरी - आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत गट ग्रामपंचायत किटाळी , आकापूर , सुर्यंडोंगरी या तिन्ही गावातील दारुबंदी झालीच पाहीजे अशा ठराव ग्रामसभेत तिन्ही गावातील महिलांनी घेतला असुन दारुविक्री करणाऱ्या व्यक्तीला शासकिय दाखले देण्यात येणार नाही असे किटाळी गट ग्रामपंचायत चे सरपंच लिंगायत यांनी बैठकीत सांगीतले. दारू विक्रेत्याला दोन हजार रुपये दंड तर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तीवर हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल असा ठराव महिला संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
ग्रामसभेच्या अध्यक्षा संगिता मडावी व धोटेताई आदिनी दारूबंदी विषयी महिलांना मार्गदर्शन केले. सुर्यंडोगरी येथून दारूचा पाठ वाहतो तो सर्वप्रथम बंद करणे गरजेचे आहे. आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदारांना निवेदन देऊन किटाळी - आकापूर व सुर्यडोंगरी या तिन्ही गावातील दारूबंदी झाली पाहिजे यासाठी तिन्ही गावातील महिलांनी पुढाकार घेऊन दंड थोपाटला आहे. त्यामुळे दारु विक्रेत्याचे व दारू शौकिनाचे धाबे दणानले आहेत.
Post a Comment