न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
धानोरा - पंचायत समिती धानोरा अतंर्गत येत असलेल्या सुरसुंडी ग्रामपंचायत चे कार्यालय नेहमीच कुलुपबंद असल्यामुळे सदर ग्रामपंचायत मधे ग्रामसेवक - चपराशी कार्यरतआहेत की नाही अशा प्रश्न सुरसुंडी ग्रामस्थाकडून केल्या जात आहे. सुरसुंडी ग्रामपंचायत धानोरा - मालेवाडा रस्तावर असले तरीही सदर गांव हे आदिवासी अतिदुर्गम व नक्षलाईट म्हणुन सुरसुंडी ची ओळख आहे. यामुळेच ग्रामसेवकाचे चांगलेच फावले आहे. महिण्यातून एकदा हजेरी लावली तरीही माझे कुणी वाकडे करणार नाही या तोऱ्यात
ग्रामसेवक वावरतांना दिसतो. त्यामुळे ग्रामस्थांना दाखल्यासाठी वाट बघावी लागतो. ग्रामपंचायत कार्यालय काळी कुंट झाली असुन रंगाचा कलर कधि बसलाच नाही. अवतीभोवती केरकचरा , नाल्याची दैनिय अवस्था , घरकुलसाठी ग्रामस्थाची वाट बघने , पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नाल्या तुंटुब भरलेल्या अश्या अवस्थेत ग्रामस्थ आपले जिवन जगत आहेत पंचायत समिती धानोरा बिडिओंना तक्रार करूनही
मिलीभगत असल्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. सदर ग्रामपंचायत ची तक्रार शेवटी कलेक्टरकडे देण्याचे ग्रामस्थ ठरवित आहेत. अश्या प्रकारची माहिती ग्रामस्थानी आमच्या प्रतिनिधीकडे दिली.
Post a Comment