जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ होणार नाही तोपर्यंत बहुजनांच्या विचारधारेची सत्ता निर्माण होणार नाही ...भरत येरमे




गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
 - मुनिश्वर बोरकर
संपादक 
 गडचिरोली - जोपर्यत डॉ. बाबासाहेबांच्या विचारासी एकनिष्ठ होणार नाही. तोपर्यत सत्ता परिवर्तन होणार नाही व सत्तेशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही. अश्या प्रकारचे विचार भरत येरमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. गांधी चौकातील विश्रामगृह



 गडचिरोली येथे पार पडलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यकमाचे अध्यक्ष वंचित चे भरत येरमे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , बामसेफ चे जिल्हाधक्ष भोजराज कानेकर , शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम ' बिआरएसपी चे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे ' गोंगपाचे प्रशांत मडावी , आदिवासी समाज सेवक गुलाबराव मडावी ' अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे विलास निंबोरकर , सामाजीक कार्यकर्ता सम्मय्या पसुला ' रामनाथ खोब्रागडे , पिरिपाचे मारोती भैसारे , आदि लाभले होते. याप्रंसगी कानेकर सर म्हणाले की, जगात १२५ देश्यातील १० विद्ववान पैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विद्धवान होते. त्यामुळे त्यांनी भारत देशाची राज्यघटना लिहुन भारत देशाला बहाल केली म्हणुन



 संविधानाचे जतन करणे काळाची गरज आहे . याप्रंसगी प्रा. मुनिश्चर बोरकर , गुलाबराव मडावी , रामनाथ खोब्रागडे , विलास निंबोरकर , पंडीत मेश्राम आदिचे समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचलन दिलीप गोवर्धन यांनी केले. कार्यक्रमास प्रमोद राऊत , तुळसीदास सहारे , जिवन मेश्राम ' रोशन उके ,डोमाजी गेडाम , अरुण शेंन्डे ' हेमंत मेश्राम ,लवकुश



 भैसारे , दिलीप तेलंग , अरविंद वाळके , नाजुक भैसारे , संघमित्रा राजवाडे , लता भैसारे , प्रेमिला नानोरीकर , रत्नघोष नानोरीकर , ज्योती मेश्राम , वनिता पदा , अमोल मेश्राम , किशोर मेश्राम ,मंगलदास शेंन्डे , शांतीलाल लाळे ' आदि सहीत बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments