न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - जिल्हासत्र न्यायालय गडचिरोली येथील एका न्यायधिसाचा पोलीसगार्ड यांनी स्वतः वरच आपल्या बंदुकीने गोळी झाडून आपली जिवन यात्रा संपविली. आज दि. ११ डिसेंबर दुपारी साडेतिन च्या दरम्यान उमाजी केवळराम होळी वय ४६ वर्ष हा आपल्या कर्तव्यावर हजर असतांना त्यांनी न्यायालयाच्या आवारातच आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने स्वतःवरच गोळी झाडली. पोलीस शिपाई होळी हे राहणार बेळगांव तालुका कोरची जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असुन ते जिल्हासत्र न्यायालयात
कार्यरत होते. त्यांनी स्वतःवरच गोळी झाडण्याचे कारण कळू शकले नाही. परंतु मानसिक तानतनावातुन सदर कृत्य केले असल्याचे बोलल्या जात असुन. गडचिरोली पोलिसांनी होळी यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्यु घोषीत केले व त्यांचा मृतुदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला .
Post a Comment