गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
9130423130
आरमोरी
सूर्य डोंगरी शेत शिवारात हत्तीने घातला धुडगूस शेतकऱ्यांचे भरपूर झाले नुकसान
आरमोरी;
तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य डोंगरी शेतशिवरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हत्तीने धुडगूस घातल्याने शेतकऱ्याने जमा केलेले धान्य धान्य पीक हत्तीने उपसून फेकल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हत्तीच्या कळप हा कधी आरमोरी तालुक्यात तर कधी कुरखेडा तालुक्यात तर कधी धानोरा तालुक्यातील जंगल शेतशिवारात मागील 3 ते 4 वर्षापासून फिरत आहे .यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.दिवसाच्या सुमारास हत्ति जंगलामध्ये तर रात्रीच्या सुमारास
शेतशीवरात अशी हत्तीची दिनचर्या असल्याने शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांवरती फार मोठे संकट ओढवले आहे . वनविभागाने तातडीने काही उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
Post a Comment