गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
मूनिश्र्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
पडलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी केले. गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव येथे संविधान दिनाचा कार्यक्रमाचे अध्यक्षआदिवासी सेवक देवाजी तोफा हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे भोजराज कानेकर , रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर अँड. विनय बांबोळे , अँड. उमेश मडावी , रिपाईचे नेते गोपाल रायपूरे कोमल रामटेके चंद्रपूर , आदिवासी नेते शिवाजी नरोटे , विनोद मडावी , वंचितचे प्रशांत देव्हारे , प्रमोद राऊत ' सरपंच मनोहर पोटावी , सनकु पाटावी , गणेश मड्डामी , संतोष वड्डे 'दिलीप गोवर्धन , दिवाकर फुलझेले ' आदि लाभले होते. याप्रसंगी कानेकर सर म्हणाले की , ७५ वर्षाच्या काळात अजुनही भारतीय
संविधानाविषयी समाजामधे अज्ञान आहे ज्या दिवशी सर्व सामान्य जनतेला संविधानाविषयी जागृती निर्माण होइल त्या दिवशी सर्व सामान्य जनतेला हक्क आणि अधिकार मिळवण्यास संघर्ष करण्याची वेळच येणार नाही तर अँड विनय बांबोळे म्हणाले की आपण सर्व संघटीत राहीलो तर सांविधान बदल करण्याची कोणाची हिम्मतच होणार नाही यापंसगी अँड. उमेश मडावी , प्रा. मुनिश्रर बोरकर , गोपाल रायपुरे ' प्रमोद राऊत ' प्रशांत देव्हारे , विनोद मडावी आदिची संविधान प्रती मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी नरोटे संचलन ज्ञानेश्वर मुजुमकर तर आभार मनोहर पाटावी यांनी मानले . कार्यक्रमास पोटेगांव सर्कल चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment