गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दिं. ०३ नोव्हेंबर २०२४
देसाईगंज (वडसा) तालुक्यातील मौजा- मोहटोला येथील जि.प.चे माजी बांधकाम सभापती तसेच ओबीसी चळवळीचे नेते व प्राचार्य स्व.रमाकांतजी ठेंगरे यांचे ब्रम्हपुरीतील दवाखान्यात अल्पशा आजाराने काल दिं.२ नोव्हेंबर ला रात्री १० :०० वा.च्या दरम्यान दुःखद निधन झाले. या संबंधित निधन झाल्याची बातमी कळल्यावर माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी त्यांच्या निवासस्थानी मोहटोला या गावी अंत्यविधी ला
उपस्थित राहून ठेंगरे परिवाराचे सांत्वन करत गाढवी नदीच्या तिरावर आयोजित या शोकसभेत आपल्या भावना व्यक्त करतांना माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले एक कर्तुत्ववान,कुशल नेतृत्व, दिन दलितांचा कैवारी,ओबीसी समाजाचा लढवया आज आपल्या मधून निघून गेला अतिशय मनाला दुःख झाला. असे बोलत मि आपल्या दुःखात सहभागी असुन देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत शोकसभेत मौन पाडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सोबत आमदार क्रिष्णाभाऊ गजबे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, तालुकाध्यक्ष सुनिल जी पारधी,किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,
तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, राजुभाऊ जेठानी,संजयजी बारापात्रे,राऊत सर,ओबीसी नेते हितेंद्र जी धोटे,नाटय कलावंत दिवाकरजी बारसागडे,रविभाऊ गोटेफोडे, तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.
Post a Comment