सापाने केला शेतकऱ्याला दंश,उपचारार्थ शेतकऱ्याचा झाला मृत्यू ...परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर...




गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 




मिळालेल्या माहितीनुसार
 कुरखेडा : शेतातील चवळीच्या शेंगांची तोडणी करीत असताना शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्याच्या पलसगड येथे घडली. मोहन आत्राम (६१) रा. पलसगड,

असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहन आत्राम यांच्या शेतातील धान कापणी व बांधणीचे काम पूर्ण झालेले आहे. त्यांच्या शेतातच चवळीचे वेल आहेत. येथे लागलेल्या शेंगा ते तोडता असताना त्यांच्या पायाला


विषारी सापाने दंश केला. त्यांच्या पायाला काहीतरी रुतल्याचा भास झाला. त्यांनी लक्ष दिले नाही. गावापासून खूप लांब अंतरावर शेत आहे. त्यामुळे त्यांना घरी परत येण्यासाठी बराच उशीर झाला. तोपर्यंत त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड आहेत..

0/Post a Comment/Comments