पोलीस भरतीचा सराव करीत असलेल्या युवकांने घेतला गळफास...



गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली /चामोर्शी 

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंसोबा येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या एका युवकाने गळफास घेवून आत्महत्या  केल्याची घटना 7 ऑक्टोबरला उघडकीस आली आहे .
प्राप्त झालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कन्सोबा येथील रहिवासी स्वप्निल विठ्ठल कुमरे वय 25 वर्ष याचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले असून सध्या तो पोलीस भरतीची तयारी करित होता अशी माहिती मिळाली आहे. मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याच्या मनामध्ये चिंता असायची मात्र त्याने सात ऑक्टोबर रोजी घरी कुणी नसल्याची पाहून दोरीच्या साह्याने पंख्याला गळफास  घेतला . घटनेची माहिती पोलीस प्रशासनात देण्यात आली लगेच आष्टी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली मृताचा पंचनामा करून  विच्छेदनाकरिता पाठवण्यात आले .



पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे .
स्वप्निल कुंमरे यांच्या मनामध्ये पोलीस बनण्याची दृढ इच्छा असल्याने त्याने पोलीस भरतीच्या शिकवणी वर्ग सुद्धा लावला होता. मात्र परिस्थिती हालाकीची असल्याने . त्याने टोकाचे पाऊल उचलले यामुळे परिवारावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे .परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments