वस्तीगृहामध्येच विद्यार्थिनीने घेतला गळफास

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 


लातूर : शहरातील कव्हा नाका
 परिसरात असलेल्या राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एका १७ वर्षीय मुलीने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले, 'धाराशिव जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलगी जातुरातील 

महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती याच महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात खोली क्रमांक २०५ मध्ये वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी तिने खोलीतील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे आढळून आले. याबाबत वसतिगृहातील कर्मचारी सारिका राजू जाधव (वय ४२) यांनी दिलेल्या माहितीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


घरात दीड एकर शेती अन् आर्थिक अडचण... 

मृत मुलगी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेतले होते. या गुणवत्तेच्या बळावर तिचा लातुरात विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला होता. दरम्यान, गुणवत्तेच्या जोरावर तिला लातुरातील राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.

0/Post a Comment/Comments