आरमोरी विधानसभेची भारतीय जनता पार्टीची आमदार गजबेना मिळाली तिसऱ्यांदा सीट, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण



गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

आरमोरी विधानसभेची भारतीय जनता पार्टीची आमदार गजबेना मिळाली तिसऱ्यांदा सीट कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी अ. ज. 67 विधानसभेची भारतीय जनता पार्टीची सीठ विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना मिळाली आहे. आमदार गजबे यांना तिसऱ्यांदा विधानसभेचे सिठ मिळाली आहे . काँग्रेस पक्षाकडून आरमोरी विधानसभे करिता मैदानात कोण उतरणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 2014 आणि 2019 विधानसभा निवडणूक मध्ये आमदार कृष्ण गजबे यांनी बाजी मारली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि त्यांच्या मनमिळावू स्वभाव कार्यकर्त्यासोबत जुळलेली. नाळ त्यांच्यावर जनतेनी दाखविलेला विश्वास विकासात्मक कामाला प्राधान्य देणे आधी बाबीचा विचार करून भारतीय जनता




 पार्टीने आमदार गजबे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा कल पाहता आमदार कृष्ण गजबे यांना विधानसभेला मोठा कस लागणार आहे .काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

0/Post a Comment/Comments