गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली
आरमोरी आरमोरी शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी शाळा महाविद्यालय परिसरात बाजार टोली साखरा रोळ टॉवर परिसर ठिकाणी देशी-विदेशी मोह फुलाची बाहेरून आयात झालेली दारू सर्रास पणे दिवसाढवळ्यावर रात्रीच्या सुमारास विक्री केल्या जाते. तालुक्यातील काही ग्रामीण भागात सुद्धा दारूने विक्रेत्याच्या घरामध्ये आपले बस्थान मांडल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता ही बऱ्यापैकी शेती व मजुरीवर अवलंबून असते मात्र दिवसातून केलेल्या कामाच्या बदल्यात मिळालेली मजुरी ही ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबातील कमवता माणूस दारू मध्ये घालवत असल्याने परिवाराचे तीन तेरा वाजले आहे .आणि याचा नाहक त्रास घरातील महिलांना होत आहे .काही लोकांना तर दारूमुळे लिव्हरचे शुगर बीपी टीबी यासारखे जीवघेणे आजार जडले आहे. काही दारू पिणारे तळीराम ओवर डोज दारू पिऊन रस्त्याच्या कडेला झोपून सुद्धा असतात यामुळे कुटुंबातील मुलाबाळांना सुद्धा याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली ही दारूबंदी फक्त कागदोपत्रीच आहे काय ?असा प्रश्न सुद्धा महिला भगिनींना पडला असल्याचे दिसत आहे. काही राजकीय पुढारी दारूबंदीच्या विषयावर ठोसपणे बोलताना दिसत नाही याचे कारण काय? असे सुद्धा जनमानसांमध्ये सुर ऊमटू लागले आहे. पोलीस प्रशासन मात्र दारू
विक्रेत्याविरोधात ठोस कारवाई करताना दिसत नाही .याला म्हणावे तरी काय? असा प्रश्न महिला व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील सामान्य गोर गरीब जनतेच्या जीवनामध्ये दारूमुळे बरबादी होऊन शरीराचा पूर्णपणे खोकला करणारी दारू (अल्कोहोल जहर) सामान्य जनतेच्या उध्वस्त संसारामध्ये मुख्यत्वा कारणीभूत ठरत आहे ,हे...! मात्र तितकेच "खरे, म्हणावे लागेल.
Post a Comment