वन्यजीव सप्ताह निमित्ताने राममाळा येथे जनजागृती रॅली...







गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 

आरमोरी वनपरिक्षेत्रातील मौजा रामाळा येथे "वन्यजीव सप्ताह " निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली. दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोंबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो त्या दरम्यान वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वन्यजीवांविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात






 येतो. सदर सप्ताहाचे औचित्य साधून आरमोरी पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा रामाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामाळा व वनपरिक्षेत्र आरमोरी यांच्या वतीने रॅली काढून



 गावांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला, आरमोरी उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री.फुलझेले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री . मडावी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती श्री.खुशाल नैताम, शिक्षीका




 सौ.पिलारे मॅडम, माकडे मॅडम, वनरक्षक अजय उरकुडे,पी.आर.पाटील, आनंद साखरे,कु.डोंगरे मॅडम, वनमजूर किर्ती मेश्राम, होणाजी कुथे, मोरेश्वर बोरूले, वाहन चालक सुनील उरकुडे व विद्यार्थी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments