एकट्याने जग बदलू शकत नाही, पण एकट्याच्या सुरुवातीने नक्की जग बदलू शकते ,या उपक्रमांतर्गत वैरागड येथे सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा परीक्षा संपन्न....


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
वैरागड 





एकट्याने जग बदलू शकत नाही पण एकट्याच्या सुरुवातीने नक्की जग नक्की बदलू शकते.
या उपक्रमांतर्गत वैरागड नगरी मध्ये विद्यार्थ्यांना एक चांगली चालना मिळावी या अनुषंगाने वैरागड येथील युवा ग्रुप यांच्या वतीने गेल्या वर्षांपासू वर्ग १ ते १२ च्या विद्यार्थ्यांनं करिता सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा परीक्षेच कार्यक्रम राबविल्या जात आहे, गेल्या वर्षात १०० विद्यार्थी सहभागी झाले होते पण गेल्या वर्षापेक्षा या वर्षी चढता क्रम घेत एकूण १५० विद्यार्थी परीक्षेत




 सहभागी झाले होते,त्या १५० विद्यार्थ्यांचे १० -१० च्या संख्येने ग्रुप बनविण्यात आले आणि ग्रुप नुसार त्यांना प्रश्न विचारण्यात आले आणि ग्रुप ला A, B, C, D... या नुसार ग्रुप ला नाव देऊन त्यांना मिळालेल्या नावाचे कार्ड देण्यात आले. प्रत्येकी एका अचूक प्रश्नाच्या उत्तर देणाऱ्या ग्रुप ला १० गुण आणि चुकीचं उत्तर देणाऱ्या ग्रुपचे ५ मार्क कपात करण्यात येत आले . या राबविण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा परीक्षेमध्ये M ग्रुप प्रथम क्रमांक , B ग्रुप द्वितीय क्रमांक , A ग्रुप तृतीय क्रमांक मिळवून विजेते झाले.*
*प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळणाऱ्या ग्रुप ला बक्षीस देऊन त्यांचं गौरव करण्यात आलं तसेच परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास पेन, बुक, पेपरपॅड आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं सन्मान करून त्यांचं मनोबल वाढविण्यात आलं त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.. प्रश्नमंजुषा परीक्षा निमित्ता्य्या
 अध्यक्ष म्हणून संगीताताई पेंदाम उदघाटक विजय गुरनुले सर,रेखा भैसारे, प्रतिभा बनकर सदस्य ग्रामपंचायत,चटके सर, प्रशांत नागोसे,सुरेंद्र वासनिक, यांनी उदघाटन सोहळा पार पाळून दिला आणि कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अभिजीत तावेडे, रोहित बनकर, रुचित बोधनकर, अंकित बोधनकर, ओम आकरे, हेमंत कोकोडे, अभिमन्यू नव्हाते,राहुल बनकर, सुरज बावणकर, पवन आकरे आदी. मान्यवर व परीक्षा पर्यवेक्षक यांची  प्रामुख्याने उपस्थित होती.

0/Post a Comment/Comments