धानाला प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती..





गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
तालुका प्रतिनिधी 
तिरोडा 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही तिरोडा (जि. गोंदिया): राज्यातील महायुती सरकार हे. शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी, त्यांचे विजेचे बिल माफ व्हावे, कृषी पंपासाठी




 करावी लागणारी प्रतीक्षा करण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली. गेल्यावर्षी धानाला प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला होता. त्यात यावर्षी वाढ करून २५ हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.

तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन योजना टप्पा-२ या कामांचे भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. धानाला २५ हजार रुपये बोनस मिळावा म्हणून तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आणि धानाला निश्चितच हेक्टरी २५ हजार बोनस जाहीर करणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला..




0/Post a Comment/Comments