तीन जणांचा तलावात बुडून मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील घटना





गडचिरोली सुपर फास्ट न्युज 
 वृत्तसेवा 

गोंदिया : दुर्गा विसर्जनासाठी तलावावर

गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना दसऱ्याच्या दिवशी शनिवारी (दि. १२) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील लोधीटोला (सावरी) येथे घडली. आशिष फागुलाल दमाहे (२३) रा. लोधीटोला सावरी, विशाल फागुलाल दमाहे (२०), यश गंगाधर हिरापुरे (१९) अशी मृतांची नावे आहेत. दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी हे तिन्ही तरुण शनिवारी मंडळाच्या सदस्यांसह गावातील तलावावर गेले होते. मूर्ती संपूर्ण बुडावी म्हणून तिघेही खोल पाण्यात उतरले. मात्र मूर्ती विसर्जन करताना खड्यात तोल गेल्याने आशीष दमाहे, विशाल दमाहे या दोन सख्ख्या भावांसह यश हिरापुरे हा युवक

आशीष व विशाल दमाहे यश हिरापुरे बुडाला. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. बचाव पथकाने तलावात शोधमोहीम राबवून तिन्ही युवकांचे मृतदेह रविवारी (दि.१३) पहाटे ३ वाजता बाहेर काढले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


तपास सहायक पोलिस निरीक्षक शशीकरण नवकार करीत आहेत. मूर्तीच्या विसर्जनासाठी लोधीटोला येथील आठ ते १० तरुण तलावात उतरले होते. यश हिरापुरे, आशीष दमाहे, विशाल दमाहे आणि

आशीष दमाहे याची यंदाच लष्करात निवड झाली होती. प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो भारतीय लष्करात सहभागी होणार होता. परंतु देशसेवा करण्याची संधी त्याच्या हातून हुकली. काळाने घाला घातला अन् आशिषचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

धरून बसलेला आणखी एक युवक पुढे आले. याचदरम्यान तिघांचा मृत्यू झाला. या गावतलावातून रस्त्याच्या कामासाठी मे २०२४ मध्ये गौण खनिजासाठी खोदकाम करण्यात आले. त्या ठिकाणी तयार झालेल्या मोठ्या खड्याने घात केला.

0/Post a Comment/Comments