माजी उपसरपंच व पोलीस पाटील यांनी सांस्कृतीक भवन व राष्ट्रीयकृत बँक नसल्याची खंत खेमराज भावु नेवारे यांचेकडे केली वेक्त....




गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 

गडचिरोली 
देसाईगंज तालुक्यात शंकरपूर ते डोंगरगाव/हलबी या मार्गावर विहीरगांव हे ठिकाण मध्यस्थानी आहे. पोटगाव,विठ्ठलगाव डोंगरगाव /हलबी, पिंपळगाव, चिखली रिठ अशी गांवे एकमेकांना जोडून आहेत.गावची लोकसंख्या बहुसंख्य प्रमाणात आहे. येथील लोकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारतीय स्टेट बँक,शंकरपूर येथे जावे लागते.त्यामुळे नागरिकांना नाहकचा त्रास होतो व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.वयोवृद्ध महिला व पुरुष तसेच मजुरी सोडून मजुरांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी शंकरपूर व वडसा येथे जावे लागते.
याठिकाणी जर एखादी राष्ट्रीयकृत बँक मंजूर झाली तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावांना याचा लाभ मिळेल व बँकेच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल.
तसेच या गावात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी सांस्कृतिक भवन नाही ते निर्माण झाल्यास आजूबाजूच्या गावकऱ्यांना लग्न सोहळे,विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.


यासाठी अनेकदा शासनाकडे मौखिक मागणी केली तरी पूर्ण झाली नाही अशी खंत माजी उपसरपंच उमाशंकर हारगुडे, व पोलीस पाटील मन्साराम दोनाडकर यांनी खेमराज भाऊ नेवारे यांचेकडे व्यक्त केली तेव्हा खेमराज भाऊ नेवारे यांनी भविष्यात मागणी पूर्ण करण्याचा निर्धार केला.याप्रसंगी नरेश वासनिक, वामन नहाले, भोलेनाथ दोनाडकर आणि गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी एकमात्र कटिबद्ध युवा उमेदवार.

खेमराज वातुजी नेवारे
देसाईगंज जि. गडचिरोली.
📱9325969029.

0/Post a Comment/Comments