जिल्हा परिषदेच्या अभियंत्याच्या मागण्या मान्य होईपर्यंत लेखणी बंद व असहकार आंदोलन जिल्हा परिषद समोर सुरू....

 

गडचिरोली
सुपर फास्ट न्युज 
 वृत्तसेवा 

 मुनिश्वर बोरकर
संपादक

 गडचिरोली - बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रवास देयके रुपये ५७ लक्ष प्रलंबित आहेत ते त्वरीत देण्यात यावे एकस्तर योजने अंतर्गत कनिष्ठ अभियंता यांना उपअभियंता पदाचे वेतन देण्यात यावे व इतर महत्वाच्या मागण्या साठी जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा गडचिरोली चे सर्व अभियंते जिल्हा परिषद गडचिरोली समोर आंदोलन करीत असुन जोपर्यत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यत लेखणी बंद व असहकार आंदोलन सुरूच राहील व बांधकामावर काहीही परिणाम झाल्यास अभियंते



 जबाबदार राहणार नाही अस्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि. के. एस. ढवळे सचिव इंजि. पी.बी. झापे यांनी दिले. बांधकामात अनियमितता आल्यास केवळ कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील कंत्राटदार , उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना सुद्धा जबाबदार धरण्यात यावे. बांधकामांचे अंदाज पत्रक तयार करणे , कामावर नियंत्रण ठेवणे भेटी देणे , देयके तयार करणे आदी कामे करण्यास अभियंत्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो तेव्हा पि. एम. एस प्रणाली उपलब्ध करून घ्यावी , ५ वर्ष सेवा झालेल्या अभियंत्यास कनिष्ठ अभियंता व १० वर्ष सेवेत असलेल्या अभियंत्यास शाखा अभियंता म्हणुन पदोन्नती देण्यात यावी. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना घरकुलाच्या कामातून मुक्त करण्यात यावे.




 प्रलंबित सेवा जेष्ठता सुची पुर्ण न करणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी. आदि विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यात आलेले असून शासनाने आमच्या मागण्या पुर्ण कराव्यात यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष इंजि. ढवळे सचिव फाये , कार्यकारी अभियंता मोरे ,कार्याध्यक्ष इंजि. सिडाम , उपाध्यक्ष इंजि . एम.टी. रामटेके , इंजि. एस. एम . दुर्गे इंजि. के. आर. सलामे कोषाध्यक्ष इंजि. बि. व्हि. शेन्डे , सहसचिव इंजि. जि. के. शिरपुरकर , प्रवक्ता इंजि. ए. एम. अगळे , महिला




 प्रतिनिधी इंजि. ए.पी. कावळे , राज्य कार्यकारी सदस्य व्हि. ए. मेश्राम , इंजि. हरिदास ढेभुर्णे ,इंजि विनोद दशमुखे साहित जिल्हयातील बहुसंख्य इंजिनिअर लेखणी बंद असहकार आंदोलनास बसले आहेत.

0/Post a Comment/Comments