स्वतःच्या सासूची सुनेने सुपारी देऊन केली हत्त्या...





गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
नागपूर 
 नागपूर: पती व मुलगा दोन्हीही मरण न पावलेल्या एका महिलेची तिच्याच  सुनेने चुलतभावांना सुपारी देत हत्या करवून घेतली. सासूच्या मृत्यूनंतर तिने त्यांना हार्ट अटॅक आल्याचा बनाव केला होता. मात्र तिच्याच पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीने झालेला पूर्ण प्रकार सांगितला व या हत्येचा उलगडा झाला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

 सुनीता ओंकार राऊत (५४, मित्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे, त्या सून वैशाली अखिलेश राऊत (३२)



होत्या. २८ ऑगस्ट रोजी वैशालीने सुनीता यांचे भाऊ भगवान मेंढे यांना फोन करून त्या पलंगावर निपचित पहल्या असल्याची माहिती दिली. वः पाREDMIसोला गयाPRIMEांन 5 लीचा त्रास होता व

संपत्तीच्या मोहातून केली हत्या, दोन लाखांची सुपारी

वैशालीचे दोन्ही चुलतभाऊ मध्य प्रदेशातील पांडुर्णाजवळील भांडारगोंडी येथील रहिवासी आहेत. दोन महिन्यापासून सुनीता या वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेत होत्या. सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने दोन्ही भावांना दोन लाखांची सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता तिने दोघांनाही मागील दाराने आत घेतले, ती सासूच्या छातीवर बसली व भावांनी त्यांचा गळा आवळला. हत्या झाल्यावर दोघांनाही तिने गावाला रवाना केले, मात्र झटापटीत सुनीता यांच्या गाल व चेहऱ्यावर जखमेच्या खुणा राहिल्या, त्या काही नातेवाइकांनी नोंदविल्या होत्या.

त्यातूनच हार्ट अटॅक आला असावा अशी वैशालीने बतावणी केली. त्याच दिवशी रात्री पावणेनऊ वाजता सुनीता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शेजारील लोकांमध्ये

सासू व सुनेत वाद झाला असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, रात्री दोन मामा घरात आले होते व त्यांनी सुनीता यांना गळा दाबून मारले अशी माहिती वैशालीच्या पाच वर्षीय मुलीने मेंढे यांना दिली. यावरून संशय बळावला. वैशालीने २७ ऑगस्ट रोजी वडिलांना चिकुनगुनिया झाल्याचे कारण सांगत शेजारील महिलेकडून १० हजार रुपये घेतले होते. ते तिने तिचा चुलत भाऊ श्रीकांत हिवसे याला भाडेकरूच्या मोबाइलवरून पाठविले होते. मात्र अंत्यसंस्काराला तिचे वडील एकदम ठणठणीत स्थितीत आले होते. वैशालीने श्रीकांतता 107097/2024 17:07

पैसे पाठविल्याची बाब चौकशीतून समोर आली. सखोल चौकशीअंती पोलिसांनी वैशाली तसेचं तिचा भाऊ श्रीकांत (२५) रितेश प्रकाश हिवसे (२७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, लक्ष्मण केंद्रे, सुशांत उपाध्ये, पंकज बावणे, स्वाती माळी, पुष्पांजली जांभळे, गणेश मुंढे, ऑकार बारभाई, मनोज नेवारे, संतोष नल्लावार, नितीन सोमकुवर, अश्विन सहारे, नरेश श्रावणकर, कुणाल उके, रुखसार शेख

0/Post a Comment/Comments