आंदोलक झाले संतप्त, सरपंच ग्रामसेविका व उपसरपंचाच्या खुर्चीला घातला चपलांचा हार...





गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
वैरागड
 दिनांक 20 सप्टेंबर 2024 पासून सोनपुर पेसा समिती पदाधिकारी व गावकऱ्यांच्या वतीने सोनपुर येथील आबादी जागेवरील अतिक्रमण व विविध मुद्द्यांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू असून गेल्या आठ दिवसात ग्रामपंचायत प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलन कर्ते संतप्त होऊन सरपंच ग्रामसेविका व उपसरपंच यांच्या खुर्चीला चपला जोड्यांचा हार घालून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला.




सोनपूर येथील पेसा समिती व गावकऱ्यांच्या वतीने गेल्या सात-आठ महिन्यापासून सतत ग्रामपंचायत प्रशासन व वरिष्ठ कार्यालयांना निवेदने देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी विनंती करण्यात आली परंतु सदर मागण्या ह्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने या मागण्यांवर ग्राम पंचायत प्रशासनाने तोडगा काढावा म्हणून पेसा समिती पदाधिकारी व सोनपूर येथील सर्व गावकरी हे दिनांक 6 जून 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले होते त्या आंदोलनात ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी हमीपत्र देऊन मागण्या पूर्ण करण्यात असल्याचे आश्वासन दिले परंतु चार महिण्याचा कालावधी उलटून सुद्धा एकही मागणी पूर्ण न झाल्याने दिनांक 20 सप्टेंबर 2024 पासून पुन्हा बेमुदत साखळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आठ दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने शेवटी आंदोलन कर्ते संतप्त होऊन सरपंच ग्रामसेविका व उपसरपंचाच्या खुर्च्यांना चपला जोड्यांचा हार घालून निषेध व्यक्त केला व येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.




0/Post a Comment/Comments