जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाखरा येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ,तथा शिक्षक दिन उत्साहात संपन्न..




आरमोरी
गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

 दिनांक 5 सप्टेंबर 2024 डॉ्.सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती यांच्या जयंती प्रित्यर्थ शिक्षक दिनाचेऔचित्य साधून जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय जोगीसाखरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळच्या प्रहरात विद्यार्थ्यांचा कडून स्वयंशासन दिना चा कार्यक्रम घेण्यात आला व दुपारच्या सत्रात शिक्षक दिन बालिका सुरक्षा दिन व व विद्यालयाचे जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये नव्यानेच नियुक्त झाले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या



 कार्यक्रमाला अध्यक्ष श्रीकृष्ण खरकाटे प्राचार्य, प्रमुख अतिथी ज्योती राक्षे मॅडम महिला पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी, सौ जयश्री सोनकर मॅडम महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी, सत्कारमूर्ती राकेश केवळराम गुरनुले, शुभम राजेंद्र चौधरी व दीक्षा विलास चौके विद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक वृद आणि विद्यार्थी हे कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात ज्योती राक्षे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


0/Post a Comment/Comments