जितु भाऊ धात्रक यांच्या पुढाकाराने नेहाबुजरुक येथील दारू बंद..




गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

प्रा. मुनिश्र्वर बोरकर 
संपादक 

 गडचिरोली 
जितूभाऊ धात्रक ह्यांच्या पुढाकाराने मेहा बुजरुक ची दारू बंद . गडचिरोली मुनिश्वर बोरकर पाथरी मेहा तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे गावात दारूबंदी करण्यासाठी जितूभाऊ धात्रक ह्यांच्या पुढाकाराने ५०० महिला आणि पुरुष यांची गावात सभा घेऊन पोलिस स्टेशन पाथरी येथे ट्रैक्टर घेऊन मोर्चा नेला असता मेहा ( मुजरूक) येथे दारूचा महापूर असतो त्यामुळे




 गावातील महिला दारू विक्रेत्यामुळे त्रस्त झालेल्या आहेत. तेव्हा आपण आमच्या गावातील दारुबंद करावी दारू विक्रेतांना पकडावे असे जितुभाऊ नी पाथरी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना सांगीतले त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी ठाणेदार साहेब यांनी स्वतः दखल घेऊन गावात स्वतः येऊन गावात सभा घेतली आणि गावात दारूबंदी करण्याचा शब्द दिला..
एक पाऊल गाव सुधारणेकडे
समाजसेवा हीच ईश्वरसेवा होवो गावातील दारूबंदी होवून गावातील महिलांना त्रास होवू नये असे जितुभाऊ धात्रक यांनी सांगीतले.

0/Post a Comment/Comments