वैरागड, कोजबी परिसरात धान्य पिकावर वाढला करपा, तुडतुडे ,खोडकिडी, अळीचा प्रादुर्भाव ,शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी बद्दल कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज...





गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा .

दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
9130423130
गडचिरोली
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड ,कोजबी ,करपडा, शिरशी विहीरगाव परिसरात धान्य पिकावरती खोडकिडा ,करपा ,तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव धान्य पिकावर दिसून येत आहे यावर्षी चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या धान्य पिकावर दोन-तीनदा संकट आले आहे या संकटांमध्ये प्रामुख्याने पूर बुळी अतिवृष्टी सुसाट वारा आणि सध्याच्या घडीला धान्य पिकावर रोगाचे आक्रमण मोठ्या झपाट्याने वाढत आहे आणि  यामुळे शेतकरी पूर्णतः हवाल दिलं झाल्याचे दिसून येत आहे. सध्या धान्य पिक असल्याने शेतकऱ्यांना धान्यावरील रोगांवर नियंत्रन मिळविण्याकरिता करीता
कीटकनाशक कसल्या प्रकारचे फवारायचे आणि रोगावर नियंत्रण मिळवायचे याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सध्या गरज असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी कृषी केंद्र मध्ये कीटकनाशक घेण्याकरिता जात असतात मात्र त्यांना प्रत्यक्ष कीटकनाशक कोणते फवारायचे हे माहीत नसल्याने कृषी केंद्र चालक त्यांना स्वतःच्या फायद्याकरिता काही कीटकनाशके देत असतात. आणि त्या कीटकनाशकाच्या धान्य रोगावरती नियंत्रणाकरिता परिपूर्ण उपयोग होत नसतो यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होतं असते . आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होत असते आणि वेळेचे सुद्धा नुकसान होत असते .धान्यावरील रोगाचे वेळेवर नियंत्रण होत नसल्याने धानावरील रोग वाढून धान्य पीक फस्त होत




असल्याने शेतकऱ्यावरती मोठे संकट उभारले आहे.
कृषी विभागाने कीटकनाशक फवारणी धान्य रोगावर नियंत्रण आणण्याकरिता कशाप्रकारे करायची आणि कोणत्या प्रकारचे किटनाशक वापरायचे याबद्दल कृषी विभागाने सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे असे परिसरातील शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.




0/Post a Comment/Comments