सावधान गडचिरोली शहरातील मुख्य बस स्थानकावर चोरीचे वाढले प्रमाण, पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण व त्यांच्या टीमची उत्कृष्ट कामगिरी, गडचिरोली मुख्य बस स्थानकावरून चोरी गेलेल्या मोबाईलची अवघ्या दोन तासात लावला शोध...




गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 

दिंनाक : 05/09/2024

गडचिरोली: गडचिरोली शहरातील मुख्य बसस्थानकावरून दूपारी 3 वाजता ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर, नागपूर बस मध्ये चळतांना त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पर्स चोरीला गेली आहे.लगेच गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून उप निरीक्षक दिपक चव्हाण यांना माहिती दिली असता लगेच त्यांच्या टिमने चौकशी करून अवघ्या दोन तासात मोबाईल चा शोध लावला.

सदर बातमी या प्रमाणे आहे कि ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर हि महिला काहि कामानिमित्त मूल ता सावली येथे बुधवार ला गेली व गुरूवार ला आपल काम आटोपून सदर महिला सावली वरून गडचिरोली बस स्थानकावर दूपारला 2 च्या दरम्यान पोचली असता नागपूर बस हि 3 च्या दरम्यान नागपूर बस मध्ये बसली असता तिकिट काढण्यासाठी बॅग मध्ये पर्स बघित असतानां त्यांच्या लक्षात आल कि पर्स चोरीला गेली आहे त्या पर्स मध्ये मोबाईल व काही पैसे होते.लगेच बस स्थानकातील चौकशी विभाग येथे माहिती दिली असता त्यांनी त्या प्रवासीला कुठल्याही प्रकारची सहकार्य न करत तूमची वस्तू चोरी झाली तर आम्ही काय करू? हे तर दरोजचेच आहे अस मनून हाथ वर केले.

हि घटना युवा मराठा न्यूज गडचिरोली जिल्हा अध्यक्ष सूरज गुंडमवार यांना माहिती मिळतांच लगेच त्या महिलेला स्थानीक पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जावून पोलिस उपनिरीक्षक दिपक चव्हाण यांना माहिती दिली लगेच उपनिरीक्षक साहेब व त्यांच्या टिम ने चौकशी सूरू केली व लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासामध्ये त्या चोरी गेलेल्या पर्स चा शोध लावून त्या महिलेला वापस दिले त्या महिलेने उपनिरीक्षक दिपक चव्हाण व त्यांच्या टिम चे आभार मानले.


यावेळी पुढिल तपास उपनिरीक्षक दिपक चव्हाण,पोलिस हवालदार मेश्राम ,बेसरा,पोलिस नाईक,चौधरी,पोलिस शिपाई गवडकर ,हिचामी ,पूरी,खोब्रागडे करित आहेत.

0/Post a Comment/Comments