प्राध्यापक डॉक्टर नोमेश मेश्राम यांच्या कविता संग्रहाला दत्तात्रेय सांडू प्रतिष्ठान मुंबईचा प्रथम पुरस्कार जाहीर...




गडचिरोली
सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा 
 


मुनिश्वर बोरकर

संपादक
 आरमोरी -
आरमोरीच्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नोमेश नारायण मेश्राम यांच्या मागील वर्षी राजहंस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित 'रक्तफुलांचे ताटवे ' या कवितासंग्रहाला मुंबई येथील दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा सन २०२३-२४ चा सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.साहित्य विश्वात अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्य असले तरी उच्च दर्जाची काव्यनिर्मिती करीत असल्याबद्दल त्यांच्या कवितासंग्रहाला हा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक देऊन गौरवान्वित केले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद सांडू यांनी कळविले आहे.रोख ५००० रू.,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर २०२४ मध्ये मुंबई येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कवितासंग्रहाला मिळालेला हा तब्बल २० वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.या कवितासंग्रहाचे प्रकाशन मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते,रा.तू.म.नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.शैलेंद्र लेंडे,राजहंस प्रकाशनाचे नरेश सबजीवाले,समीक्षक डॉ.विजय रैवतकर यांच्या उपस्थितीत विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या अमेय दालनात झाले होते.त्यांच्या कवितांची विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांसाठी निवड झाली असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments