तास गवाजावळ भिवापूर नागपूर रोडवर ट्रक आणि ट्रॅव्हल्स चा झाला भीषण अपघात ,ट्रॅव्हल्स मधील सहा तर ट्रक मधील तीन जण जागीच ठार अनेक जखमी....




गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

मुनिश्र्वर बोरकर 
 संपादक गडचिरोली 


तास गावाजवळ (भिवापूर) नागपूर रोडवर ट्रक आणि ट्राव्हल्स चा भिषण अपघात . ट्राव्हल्स मधील ६ तर ट्रक मधील 3 जागीच ठार अनेक जखमी. गडचिरोली मुनिश्वर बोरकर भिवापूर - नागपूर - भिवापूर हायवे रोडवर भिवापूर जवळील तास गावाजवळ ट्राव्हल्स आणि उभ्या ट्रक च्या भिषण अपघातात ट्राव्हल्स मधील ड्रायव्हर आणि पाच प्रवास्या सहीत सहा तर ट्रक मधील ड्रायव्हर पानटेलावाल्यासहीत दोन एकंदरीत आठ जनाचा जागीच मृत्यू झाला. ट्राव्हल्सच्या अति वेगामुळे अपघात होवून ट्राव्हल्स व ट्रक चा चेंदामेंदा



 झाला. दि. ५ ऑगष्ट २०२४ ला नागपूर वरून ब्रम्हपुरी जाणारी मॉ दुर्गा ट्राव्हल्स भिवापूर कडे वेगाने जात असतांना भिवापूर तालुक्यातील तास गावा जवळ हायवे रोडवर परमात्मा एक या चहा टपरी जवळ उभी असलेली MH - 33 Ap 2966 क्रंमाकाची ट्रक ला दुपारी १२ चे सुमारास धडक दिल्यामुळे चहा पेत असलेला ट्रकचा चालक पानटेला वाला व अन्य एक ट्रक खाली दबल्या गेलेत तर ट्रकचा टायर निघुन ट्रक ने पलटी खाल्ली तर ट्रक चा पुढील भाग चेंदामेंदा झाला. ट्राव्हल्स मधील ड्रायव्हर व अन्य पाच प्रवासी सहीत सहा व्यक्ती जागीच ठार झाले . ट्राव्हल्सची




क्यॉबिन पुर्ण शतिगत झाल्यामुळे तिन चार व्यक्ती ट्राव्हल्स च्या अंदर दबल्या गेलेत. भिवापूर पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी दोन स्क्रेन च्या सहाय्याने दबलेल्या लोकांना बाहेर काढले तर किरकोड जखमी प्रवासांना ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे पाठविण्यात आले. बघ्याच्या गर्दीमुळे रहदारी एक तास बंद ठेवावी लागली. मृत्युकांचे नावे कडू शकले नाही.


0/Post a Comment/Comments