झोपेमध्ये असताना झाला सर्पदंश, मुली पाठोपाठ आईचाही झाला मृत्यु...





गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 

गोंदिया : जेवण करून झोपी गेलेल्या मायलेकींना

ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मंजू उसेंडीचा उपचार घेताना रविवारी पहाटे ४:२० वाजता चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. तर कमळाबाई सुखीराम उसेंडी (३१) यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारासाठी आणताच सकाळी ६ वाजता डॉ. मोनल अग्रवाल यांनी त्यांना मृत घोषित केले.


खाटेवरच विषारी सापाने चावा घेतला. यात उपचारादरम्यान मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना देवरी तालुक्यातील गुजूरबडगा येथे रविवारी घडली. मंजू सुखीराम उसेंडी (६) व कमळाबाई सुखीराम उसेंडी (३१) (दोन्ही रा. गुजूरबडगा येळमागोंदी) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुजूरबडगा येथील उसेंडी कुटुंबीय शनिवारी मध्यरात्री झोपले असताना त्या मायलेकींना ८ सप्टेंबर रोजी पहाटे २ च्या सुमारास विषारी सापाने दंश केला. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघींनाही चिचगड येथील


सर्पदंशाने मायलेकीचा मृत्यू झाल्याने उसेंडी कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या घटनांची नोंद चिचगड पोलिसांनी घेतली आहे. तपास ठाणेदार तुषार काळेल यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

0/Post a Comment/Comments