मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर, उपक्रमात मुसरागुड्डा प्राथमिक शाळेला तिसरा क्रमांक प्राप्त...





गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

 मुनिश्वर बोरकर
संपादक 


 गडचिरोली - कसनसुर केंद्रा अर्तगत प्राथ.शाळा मुसरमगुडा शाळेला मुख्यमंत्री
माझी शाळा सुंदर या उपक्रमा अर्तंगत केंद्रात तिसरा क्रंमाक पटकविलाअसुन सदर पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक नरोटे सर सह शिक्षिका अर्चना सेमस्कर यांना प्रदान केले असुन त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. मुसरागुडा गावाची लोकसंख्या 300 च्या जवळपास असुन शाळेची पटसंख्या जेमतेम २९ होती तरीही शिक्षकामधे विद्यार्थाना शिकविण्याची तळमळ व यातूनच शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे , शाळेच्या सभोवताली झाडे लावून , बाग फुलविणे जनु शाळेचा परिसर निसर्गरम्य तयार करण्यात आला त्यामुळे शैक्षणिक वातावरण सुद्धा तयार झाले. सदर कार्यात गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले त्यामुळे शाळेतील शिक्षकांना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर या उपक्रमात यश मिळवता आले. या पुढेही शाळेची प्रगती करण्याकरीता येथील शिक्षक सदैव तत्पर राहील अशी ग्वाही मुख्याध्यापक नरोटे सर यांनी दिली. गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षकांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments