भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापनेत अशोक नेते यांची वर्णी ,विधानसभेच्या तिकीट वाटपातही राहणार नेते यांची महत्त्वाची भूमिका....

 

गडचिरोली
सुपर फास्ट न्युज 
 वृत्तसेवा 

 मुनिश्रर बोरकर
संपादक

 गडचिरोली - २०२४ च्या विधान सभा निवडणुकीत भाजपाचे व्यवस्थापन कमिटी निर्माण केली असुन यात माजी केंदिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे समितीचे अध्यक्ष राहणार असुन उर्वरीत कार्यकारणीत सहसंयोजक पदी अनुसचित जमाती मोर्च्याचे राष्ट्रीय मंहामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांची वर्णी लागलेली आहे. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार अशोक नेते यांच्याकडे मोठी जबाबदारी असुन चिमुर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभेच्या तिकीट वाटपात नेते यांचा शिहांचा वाटा राहणार आहे. निवडणुकीत समोर जातांना महायुतीत भाजपा , शिवसेना , राष्ट्रवादी कांग्रेस (अजीत पवार गट ) या तिन्ही पक्षाच्या व उमेदवारांचा विचार व अभ्यास करूनही उमेदवारांना तिकीट वाटप होणार आहेत. परंतु अश्या या व्यवस्थापन समितीमुळे भाजपाच्या काही तत्कालीन आमदारांची धाकधुक वाढली आहे. गडचिरोली ,आरमोरी ब्रम्हपुरी , बल्लारसा हे




 विधानसभा क्षेत्र भाजपाकडे राहणार हे कोण्या ज्योतिषांना सांगण्याची गरज नाही . अश्यातच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तेव्हा माजी खासदार अशोक नेते यांना उमेदवार निवडणे तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments