नवीन कपडे घालू न दिल्याने शालेय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या....





गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
यवतमाळ 
 (यवतमाळ) : पोळा सणानिमित्त आणलेले नवीन कपडे सणाच्या एक दिवस अगोदर घालू न दिल्याने सहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना किनवट (ता. कळंब) येथे रविवारी दुपारी उघडकीस आली. पोळ्याच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

सोनाक्षी राजू राठोड (११), असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रमशाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. पोळ्याच्या सणासाठी सुटी घेऊन ती घरी किनवट येथे आली होती. तिच्या आईने सोमवारी साजरा होणाऱ्या पोळा सणासाठी तिच्यासाठी नवे कपडे खरेदी केले होते. हे नवींन कपडे शनिवारीच घालू दे, असा हट्ट सोनाक्षीने आईकडे धरला. नवे कपडे पोळ्याच्या दिवशी सोमवारी घालायचे, आज नाही असे



सांगून आई पोळ्याच्या बाजाराकरिता मोहदा येथे निघून गेली. शेजारीच राहत असलेले मामा दुपारी घरी आले असता त्यांना सोनाक्षी गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. • कपडे ठेवण्याच्या ताराला साडी बांधून तिने गळफास लावला होता. सोनाक्षीला सहा वर्षांचा एक भाऊ आहे. तिची आई मागील काही वर्षांपासून पतीपासून दूर माहेरी राहत आहे. मोलमजुरी करून ती आपल्या दोन लेकरांचा सांभाळ करते. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश राठोड, उपनिरीक्षक सागर भारस्कर, सहायक फौजदार अनिल कोटरंगे, बिट अंमलदार विजय लोखंडे घटनास्थळी पोहोचलेः पंचनामा करून त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments