देसाईगंज च्या गजानन मंदिर परिसरात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा ..52 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम...



गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 

देसाईगंज
(गडचिरोली):-बैल पोळ्याला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी साजरा होणारा पोळा म्हणजे तान्हा पोळा; तान्हा पोळ्याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देसाईगंज शहराच्या गजानन मंदिर परिसरात आज,मंगळवार दिनांक-३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास देसाईगंज शहराच्या माता वार्डातील युवकांच्या पुढाकारातून ५२ वर्षांपासूनची परंपरा आजही कायम राखत तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माता वार्डातील कमलाबाई गुन्नीलाल अग्रवाल यांनी सुरुवात केली परंपरा आज ही त्यांच्या मार्ग दर्शनात वार्डातील युवक परंपरा पाळत माता वार्ड गजानन मंदिर परिसरात मोठ्या जोमाने तान्हा पोळ्याची सुरुवात करत येनारा बाल गोपालाचे स्वागत केले ,शहराच्या विविध भागातील चिमुकले लाकडी बैलांना सजवून शहरातील मान्यवर,युवक,आबालवृद्ध तसेच नागरिक एकत्र गोळा होऊन तान्हा पोळा भरवल्या जात होता.


त्यानुसार माता वार्डातील युवकांकडून ही परंपरा आजही कायम राखली जात आहे.आज तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलांना सजवून शहराच्या गजानन मंदिर परिसरात शहरातील मान्यवर,युवक,आबालवृद्ध तसेच नागरिक एकत्र गोळा होऊन तान्हा पोळा भरवल्या गेला.या उत्साहाला संस्कृती आणि स्पर्धेची झालर लागलेली दिसून आली.अनेक पालकांनी आपल्या मुलांना वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणले होते. गजानन मंदिर परिसर फुगे,तोरण,पताका लावुन सजविण्यात आला.प्रसंगी महादेवाची गाणी वाजवून महादेवाच्या नावाचा जयजयकार करीत बिस्किटे,सेव-चिवडा,फराळ, चॉकलेट व इतर वस्तूंचे गजानन मंदिर देवस्थान व माता मंदिर देवस्थान यांच्या तर्फे ६०० बालकांना खाऊंचे पाकिटे वाटप करण्यात आले.प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना नोट बुकही वाटप करण्यात आले.
तान्हा पोळा प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक मनोहर भुर्रे, मोतीलाल कुकरेजा राजूभाऊ जेठानी, ढोरे साहेब , दिलीप अग्रवाल,सचिन वानखेडे ,शाम उईके , जयंत रासेकर,
कृष्णा भांडारकर,विलास लोखंडे,अनिल फडणवीस, सुधाकर राऊत,नानू मेश्राम,बाळकृष्ण राऊत,आशिष मंगर,प्रकाश वानखेडे,गजानन भुर्रे, खुशाल दोनाडकर, मनोज भुरे , प्रशांत मारबते,सचिन मशाखेत्री,हेमंत गजघाटे,संगम शेंडे,चेतन डाबरे, अमोल पत्रे, महेश मराठे,जितु बेहरे,गोलू खेडीकर,योगेश ठाकरे, योगेश शिऊकर विनू गजपूरे,अंकुश नंदागवळी,दिनेश पानसे,शहरातील व वार्डातील आबालवृद्ध तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments