वाकडी फाट्यावर ट्रक ने केला अपघात अपघातामध्ये कुंणघाडा येथील महिला ठार...

 

गडचिरोली 
सुपर फास्ट न्युज 
वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली - गडचिरोली वरून अवघ्या ५ कि.मी अंतरावरील वाकडी फाट्याच्या थोड्या समोर ट्रक ने कुनघाडा च्या महिलेला उडवले. ट्रक च्या चाकाने महिलेची भाकरच झाली बघ्याची गर्दी होती परंतु अपघात महिलेला बघावसे वाटत नव्हते. दि. ११ ऑगष्ट ४चे सुमारास कुनघाडा येथील व्यक्ती व एक महिला आपल्या टु व्हिलर गाडीने गावाकडे जात होते. इतक्यात चामोर्शी वरुन गडचिरोली जाणारी मालवाहू ट्रकने टु व्हिलर वाल्यांना धडक दिल्यामुळे गाडीच्या मागे बसलेली मय्यत महिला सौ. कुंदाबाई आखाडे वय ६० हि ट्रक च्या चक्यातच गेली त्यामुळे तिच्या शरीराचे भाकरच झाली तर व्यक्तीला सुद्धा जबर दुखापत पोहचली. मालवाहू ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाले .गडचिरोली ठाण्याच्या पोलीसांना माहिती मिळताच ठाणेदार शिजनजुडे साहेबांच्या मार्गदर्शन खाली अधिक तपास सुरु आहे . कालच सायंकाळी चांदाळा फाट्यावर चांदाळा चा सुरेश चा अपघाती मृत्यू झाला होता .

0/Post a Comment/Comments