वडसा जवळील आमगाव येथे घडला धक्का दायक प्रकार चोरीच्या आरोपाखाली चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, चिमुकल्यांना फेकले सळाकिवर,चिमुकल्याणा झाली गंभीर दुखापत...





गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा 

मिळालेला माहितीनुसार
वडसा तालुक्यांतर्गत येत असलेल्या आमगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला .चोरीच्या आरोपाखाली लहान छोट्या मुलांना एक युवक अमानुषपणे चिमुकल्यांना मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियायर वायरल होताना दिसत आहे. यामध्ये छोट्या मुलांना अमानुषपणे मारहाण करून त्यांना लोखंडी सळाकीवरती
उचलून फेकला आहे .यामुळे चिमुकल्यांना फार मोठी गंभीर
दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटना





मगाव येथील राम मंदिर परिसरात घडलेली आहे .
अमानुषपणे मारहाण प्रकरणी जनतेच्या मनात संतापाची
लाट उसळली असून पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी
प्रकरण गांभीर्याने घेवून सविधानिक कलम अंतर्गत योग्य ती
कारवाई करून त्या अमानुषपणे चिमुकल्यांना मारणाऱ्या
युवकाला अटक करावी अशी मागणी आता सामाजिक
वर्गातून जोर धरू लागली आहे.




0/Post a Comment/Comments