झाडीपट्टी कलावंत संघटनेची कार्यकारणी गठीत...



गडचिरोली
सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
वडसा -
*आमगाव* (वडसा) झाडीपट्टी मधील संपूर्ण कलावंतांचे एकत्रिकरण, त्या कलावंतांच्या विविध समस्यांचे निराकरण आणि त्या कलावंतांच्या प्रगतीसाठी अनेक मार्गांची निर्मिती करता यावी या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या झाडीपट्टी कलावंत संघटनेची बैठक श्रीराम मंदिर आमगांव येथे पार पडली यामध्ये झाडीपट्टी कलावंतांची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामधे अध्यक्ष- शेखर पटले, उपाध्यक्ष- प्रियंका गायधने, सचिव अंकुश पेटकर, कोषाध्यक्ष - मंगल मशाखेत्री, कार्याध्यक्ष - किरपाल सयाम, सहसचिव उत्तम उके, प्रसिद्धीप्रमुख - प्रणय देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रपूर - विशाल बावणे,




गडचिरोली अंबादास कांबळी, भंडारा राज बोधनकर, गोंदिया किशोर भाग्यवंत तर सदस्य म्हणुन सौ.निशा धोंगडे चंद्रपूर, गिरीशचंद्र भूरें गडचिरोली, सौ.प्रतिभा साखरे - भंडारा, चेतन वडगाये - गोंदिया तसेच मुख्य मार्गदर्शक- पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, देवेंद्र दोडके, के.आत्माराम,राजेश चिटनिस, डॉ.श्री.दिनकर चौधरी, डॉ.प्रवीण सहारे, श्री.वासु कुमार मेश्राम, श्री.यशवंत ढोरे यांची निवड करण्यात आली. या सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. विदर्भातील नामवंत नाट्य कलाकारांना कार्यकारणीत योग्य न्याय मिळाला असुन नवनियुक्त अध्यक्ष सचिवांनी नाट्य सृष्टीत मोलाचे कार्य करावे असे पदम्श्री डॉ. परशुराम खुणे यांनी सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात

0/Post a Comment/Comments