तुला खर्रा उधारी देतो म्हणून खरर्याच्या बदल्यात केला, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ,अल्पवयीन पिढीता गर्भवती राहिल्याने प्रकरण आला उघडकीस...


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
चंद्रपूर /दुर्गापूर 






उधारीच्या मोबदल्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
पीडिता गर्भवती झाल्याने उघडकीस आला प्रकार : आरोपीस बेड्या
पीडितेच्या हालचालीवरून आईला संशय
पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी



करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली, दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली. पानठेल्यावर खर्याच्या उधारीच्या मोबदल्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

बबन रोहणकर याचा पानठेला आहे. पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्चाची उधारी तीन

हजारांवर पोहोचली होती. बबनने मुलीला खर्चाची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकी दिली. मुलीकडे खरर्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून तिला शारीरिक सुखाची मागणी करून

मागील तीन ते चार महिन्यांपासून लैंगिक शोषण केले. ती गर्भवर्त झाल्याने हा प्रकार उघडकीस आला याबाबत दुर्गापूर ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली. 

0/Post a Comment/Comments